Marathi Film Distribution APC

Marathi Film Distribution APC Bussiness and Comercial Consultation for Marathi film Production Distribution and Marketing with All under one roof from release date to payment collection.

Film Marketing ,Advertising Promotions & Publicity. 360” Total Solutions. consultancy in film & entertainment Industry

‘फिल्म डिस्ट्रिब्युशन’ या विषयावर डॉ. अजय फुटाणे यांचे उद्बोधक मार्गदर्शन  ‘फिल्म सिटी’ तसेच ‘महाराष्ट्र चित्रपट, रंगभूम...
24/08/2026

‘फिल्म डिस्ट्रिब्युशन’ या विषयावर डॉ. अजय फुटाणे यांचे उद्बोधक मार्गदर्शन

‘फिल्म सिटी’ तसेच ‘महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (म)’ यांनी संयुक्तपणे आयोजिलेल्या 'डिस्ट्रिब्युशन, प्रमोशन, मार्केटिंग आणि फेस्टिव्हल प्रमोशन' या विषयावरील एकदिवसीय परिसंवादामध्ये, फिल्म डिस्ट्रिब्युटर व कन्सल्टन्ट डॉ. अजय फुटाणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दि. १८ ऑगस्ट रोजी रवींद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात फिल्म डिस्ट्रिब्युशन ह्या आपल्या जिव्हळ्याच्या विषयावर बोलताना डॉ. फुटाणे यांनी 'रिलीज प्लॅनिंग अँड स्ट्रॅटेजी' चे महत्व विषद केले. अभ्यासपूर्ण व पद्धतशीर नियोजन करणे किती महत्वाचे आहे, हे उदाहरणे व प्रत्यक्ष आकडेवारीच्या आधारे त्यांनी समजवून सांगितले.

त्याचबरोबर, सिनेमाचे बजेट निर्धारित करतानाच मार्केटिंग व डिस्ट्रिब्युशन करिता स्वतंत्र तरतूद करणे कसे क्रमप्राप्त ठरते याबाबत देखील त्यांनी उहापोह केला. निर्मात्यांनी करावयाच्या आर्थिक व्यवहारांबाबत बोलताना त्यांनी बॉलीवुड् मध्ये प्रचलित असलेल्या Advance आणि Minimum Guarantee या पद्धतीवर सविस्तर भाष्य केले.

डिस्ट्रिब्युशन हे यशाचा त्रिकोण अर्थात ‘Triangle of Success’ ची एक बाजू असून, सिनेमाच्या व्यवसायिक यशामध्ये फिल्म प्रॉडक्शन आणि मार्केटिंग इतकेच त्याला महत्वपूर्ण स्थान आहे. जाणकार व अनुभवसिद्ध डिस्ट्रिब्युटरला त्याचे एक वेगळे व्हिजन असते हे निर्मात्यांनी अवश्य लक्षात घेतले पाहिजे, असेही त्यांनी पुढे सांगितले.
पुण्यात नुकतेच (९ ऑगस्ट) रोजी त्यांनी आयोजिलेल्या ‘FILMI कीडा Producers’ Masterclass’ ला उत्तम प्रतिसाद लाभला होता. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराज भोसले यांनी ह्या मास्टरक्लासचे उदघाटन केले, तर ज्येष्ठ सिने समीक्षक व स्क्रिप्ट कन्सल्टन्ट श्री. राज काझी तसेच यशस्वी सिनेनिर्माता श्री. राजेंद्र भोसले यांची विषेय उपस्थिती लाभली होती. चीफ मेन्टॉर या नात्याने डॉ. अजय फुटाणे यांनी या कार्यक्रमात देखील ‘Triangle of Success’ वर प्रभावी सादरीकरण करताना, नवोदित निर्मात्यांना अतिशय उपयुक्त व मोलाचे मार्गदर्शन केले होते. शिवाय, उपस्थितांच्या वैयक्तिक प्रश्नांची त्यांनी दिली.

मुंबईमध्ये,काल महाराष्ट्र चित्रपट आणि रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संय...
19/08/2026

मुंबईमध्ये,काल महाराष्ट्र चित्रपट आणि रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये वितरण, मार्केटिंग आणि प्रमोशन या विषयावर चर्चा करण्यात आली, त्यात मला सहभागी होण्याची संधी आयोजक Prashant Sajanikar आणि Ashok Rane. Ji यांनी उपलब्ध करून दिली,त्या बद्दल मनपूर्वक आभार.

😊🙏🏼🌹

Mayursinh PardeshiFilmi keedaUrvi Bakshi

18/08/2026
दिनांक १८ ऑगस्ट रोजी रविंद्र नाट्य मंदिर येथे पॅनल मधे परिसंवाद सहभागी होताना वितरण, प्रमोशन मार्केटिंग या विषयावर सहभाग...
17/08/2026

दिनांक १८ ऑगस्ट रोजी रविंद्र नाट्य मंदिर येथे पॅनल मधे परिसंवाद सहभागी होताना वितरण, प्रमोशन मार्केटिंग या विषयावर सहभागी होताना विशेष आनंद होत आहे.

मान. अशोक राणे संवादक म्हणून सहभागी होत असून, फिल्मसिटी तर्फे विविध विषयावर मार्गदर्शन होत आहे.

उपस्थित राहावे ही विनंती.

Rane
Filmi keedaMayursinh Pardeshi

सुप्रसिद्ध पार्श्वगायक शान यांच्या भेटीचे भाग्य..!   आपल्या सुरेल गायकीने प्रेक्षकांना आणि रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ...
14/08/2026

सुप्रसिद्ध पार्श्वगायक शान यांच्या भेटीचे भाग्य..!

आपल्या सुरेल गायकीने प्रेक्षकांना आणि रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बॉलिवुडमधील ‘सिंगिंग सेन्सेशन’ शान यांच्या भेटीचा नुकताच योग आला.
गेली २५ वर्षे प्लेबॅक सिंगर म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले असून, त्यांना प्रचंड फॅन फॉलोविंग लाभले आहे.
‘खंजिरीचे बोल’ या मराठी चित्रपटातील एका गाण्याचे आजीवासन स्टूडियो मध्ये रिकॉर्डिंग झाले. ह्या गाण्याचे रेकॉर्डिंग हा आगळा-वेगळा अनुभव होता, तो या अर्थाने की हिंदी गायकाने मराठी गाणे आणि मराठी अभिनेत्याने हिंदी गाणी गायली, ज्यामुळे एक अनोखा आनंददायी अनुभव मिळाला.
एवढा मोठा कलाकार असून देखील कसलाही ‘इगो’ किंवा ‘ऍटिट्यूड’ नाही बरं. विन्रम स्वभावाच्या शान यांनी शेकडो गाणी गायली असून, सिने संगीत क्षेत्रात त्यांचे योगदान खूप मोठे आहे.
शान यांचे पूर्ण नांव शांतनू मानस मुखर्जी असे आहे. मूळचे कोलकात्याचे असलेले शान यांना त्यांच्या वडिलांमुळे संगीताचा वारसा मिळाला असून, त्यांची बहीण सुद्धा गायिका आहे.
शान यांनी कारकीर्दीच्या सुरुवातीला जाहिरातींसाठी अनेक जिंगल्स गायली. ‘तन्हा दिल’ (२०००) या सुपरहिट् गीतामुळे ते घराघरांत पोहोचले. त्यांची काही लोकप्रिय गाणी पुढील प्रमाणे आहेत:
१)Tanha Dil — Tanha Dil
२) Woh Pehli Baar — Pyaar Mein Kabhi Kabhi
३)Musu Musu Haasi Deu — Pyaar Mein Kabhi Kabhi
४)Woh Ladki Hai Kahan — Dil Chahta Hai
५) O Humdum Suniyo Re — Saathiya
६)It’s the Time to Disco — Kal Ho Naa Ho
७)Kuch To Hua Hai — Kal Ho Naa Ho
८)Chand Sifarish — Fanaa
९) Jab Se Tere Naina — Saawariya
१०)Behti Hawa Sa Tha Woh — 3 Idiots
११) Chaar Kadam — PK

शान यांनी हिंदीसोबत बंगाली, मराठी, कन्नड, तेलुगू, उर्दू आणि इतर भाषांमध्येही पार्श्वगायन केले आहे. त्यांची कारकीर्द केवळ playback singing पुरती मर्यादित नसून, ते गायक, गीतकार, संगीतकार, TV Host आणि परीक्षक म्हणूनही काम करत आले आहेत.

अशा महान कलाकाराची भेट झाली, त्यांच्यासोबत मला काही क्षण घालवता आले, हे मी माझे भाग्यच समजतो... यापुढे देखील वारंवार त्यांची भेट होत राहो, त्यांच्या सोबत गप्पा मारण्याची संधी मिळो हीच अपेक्षा.
- डॉ. अजय फुटाणे
फिल्म डिस्ट्रिब्युटर अँड कन्सल्टंट (मुंबई/पुणे)

'FILMI कीडा' मास्टरक्लास ला उपस्थित राहिलेल्या सर्वांचे मनापासून आभार!आपला सहभाग आमच्यासाठी बहुमूल्य असून, लवकरच आमच्या ...
12/08/2026

'FILMI कीडा' मास्टरक्लास ला उपस्थित राहिलेल्या सर्वांचे मनापासून आभार!

आपला सहभाग आमच्यासाठी बहुमूल्य असून, लवकरच आमच्या Advanced Workshop मध्ये पुन्हा भेटूया.

याचबरोबर, कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. मेघराज भोसले (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, पुणे), प्रमुख पाहुणे श्री. राज काझी (स्क्रिप्ट कन्सल्टंट) आणि विशेष अतिथी श्री. राजेंद्र शिंदे (यशस्वी सिने निर्माता) यांचे देखील आम्ही मनापासून आभार मानतो; आमच्यावरील आपला स्नेह असाच चिरंतन राहू दे हीच अपेक्षा.

टीप: पुढील वर्कशॉपची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

05/08/2026

प्रत्येक निर्मात्याने स्वतःला विचारावेत असे 10 प्रश्न

1. हा चित्रपट कोणासाठी बनवत आहे?
2. हा चित्रपट लोकांनी थिएटरमध्ये येऊन का पाहावा?
3. माझा USP (Unique Selling Point) काय आहे?
4. जर चित्रपट अपेक्षेप्रमाणे चालला नाही, तर खर्च कसा भरून निघेल?
5. Distribution ची जबाबदारी कोण घेणार?
6. Marketing साठी पुरेसा निधी ठेवला आहे का?
7. OTT ला हा चित्रपट का आवडेल?
8. Release Date योग्य आहे का?
9. प्रेक्षकांना हा चित्रपट इतरांपेक्षा वेगळा का वाटेल?
10. नफा कुठून आणि कसा मिळणार?

😊🙏🏼🌹

Address

APC F 503 Remi Bizcourt, Off Veera Desai Road, Andheri West Mumbai 53
Mumbai
400053

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11am - 6pm

Telephone

9422362505

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Film Distribution APC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Establishment

Send a message to Marathi Film Distribution APC:

Shortcuts

Share

Category