22/11/2025
🔱 हर हर महादेव 🔱
आज आपल्या “ #धर्मरक्षक_महावीर_छत्रपती_संभाजी_महाराज “ #अध्याय १, या ऐतिहासिक चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झालं….....पण हे वर्ष फक्त कॅलेंडरवरच नव्हे, माझ्या मनातही खोल कोरलं गेलंय.......रिलीजच्या वेळी "पुष्पा 2" नावाच्या चित्रपटाचे वादळ आले…......Screens कमी मिळाल्या…....Shows थांबले……पण माझ्या sorry आपल्या चित्रपटासाठी धडपड करणारे अनेक ताई, दादा, काका,मावशी,आजी, आजोबा आणि अनेक असे चेहरे ज्यांना मी कधी पाहिलंही नाही ....परंतु तरीदेखील आपल्या छत्रपती शिवशंभुंच्या प्रेमाखातर तुम्ही चित्रपटाच्या मागे उभे राहिलात अणि लढलात......तुम्ही social media ला केलेली मदत व फोन, संदेश, पोस्ट्स, रिक्वेस्ट्स आणि प्रयत्न माझ्या स्वप्नाला साथ देणारे होते, हे मी कधीही विसरू शकत नाही......
Pushpa मुळे अपेक्षित तितके Shows मिळाले नाहीत ….....परंतु pushpa 2 सारखा चित्रपट समोर असतांना देखिल २०२४ या वर्षात Theaterically सर्वाधिक जास्त काळ चालणारा मराठी चित्रपट आपला " धर्मरक्षक "हा चित्रपटच ठरला आणि हे सारं शक्य झालं तुम्हा सर्व शिवशंभुभक्तांमुळेच.....यातून मला आत्मविश्वास मिळाला आणि जाणवलं कि आपल्या या चित्रपटाला तुम्हा सर्व छत्रपती शिवशंभु भक्तांनी व तुमच्या प्रेमाने मोठं बनवलं.......
खरं सांगतो……..
त्या प्रत्येक अज्ञात शुभचिंतकांचा मी मनापासून ऋणी आहे आणि आयुष्यभर राहील……
तुम्ही दिलेली साथ माझ्यासाठी पुरस्कारापेक्षाही मोठी आहे व होती.
आपण सर्वांचे मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद…"🙏🏻🚩
आपलेच प्रस्तुतकर्ते :-
श्री. #संदिपदादा_रघुनाथराव_मोहिते_पाटील.
दिग्दर्शक :- श्री. तुषार विजयराव शेलार
निर्माते :-
श्री.शेखर रघुनाथराव मोहितेपाटील,
श्री.धर्मेंद्रजी सुभाषजी बोरा,
श्री.सौजन्यजी सूर्यकांतजी निकम,
श्री.केतन निलेशराव राजेभोसले, उर्विता प्रोडक्शन, शिवनेरी फाउंडेशन, तसेच टिम महावीर छत्रपती संभाजी महाराज व असंख्य शिवशंभू प्रेमी मित्र परिवार, महाराष्ट्र.